Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'तन्वी भारताची पुढची सुपरस्टार'

'तन्वी भारताची पुढची सुपरस्टार'

NEWS डंका 3 weeks ago

पी. व्ही. सिंधूचे भरभरून कौतुक

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने ताइपे ओपन २०२६चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचे भरभरून कौतुक केले आहे.

१७ वर्षीय तन्वीने रविवारी व्हिएतनामच्या गुयेन थुई लिन्हचा सरळ गेममध्ये पराभव करून बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ३०० स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला.

सिंधूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म **'एक्स'**वर लिहिले की, 'तन्वीमध्ये एक विशेष खेळाडू होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. तिच्याकडे प्रतिभा, उत्कृष्ट स्ट्रोक्स आणि मोठ्या खेळाडूंना भिडण्याचे धैर्य आहे. आता तिने सातत्य आणि अनुभवही मिळवला आहे. ही तर तिच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि यशाची भूक कायम ठेव.'

अंतिम सामन्यात तन्वीने केवळ ३६ मिनिटांत २१-१६, २१-१६ अशा सरळ गेममध्ये विजय मिळवत ताइपे ओपन जिंकणारी सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान पटकावला.

या विजेतेपदासह तन्वी २००८ मध्ये सायना नेहवालनंतर ताइपे ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी दुसरी भारतीय ठरली. तसेच या प्रकारात भारताचा १७ वर्षांचा दुष्काळही तिने संपवला.

यापूर्वी तन्वीने यूएस ओपनमध्ये उपविजेतेपद, तसेच ओडिशा मास्टर्स आणि गुवाहाटी मास्टर्स सुपर १०० स्पर्धांमध्येही उपविजेतेपदाची कामगिरी केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka