Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

कोटातून केली होती अटक

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात राजस्थानमधील कोटा येथे पकडण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

आरोपींना न्यायालयात हजर करून मुंबईत आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

या प्रकरणावर बोलताना, कोटाचे अतिरिक्त एसपी सुभाष चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, 'अटक केल्यानंतर, आरोपींना ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला, त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव, रात्रीचा प्रवास टाळण्यात आला.'

संबंधित घटना रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात झाली होती. टायगर श्रॉफ फुटबॉल क्लबमधून बाहेर पडत असताना त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित बचावला; मात्र त्याचा चालक आणि एका रिक्षाचालकाला दुखापत झाली. घटनेनंतर संशयितांनी दुचाकी सोडून पळ काढल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थान पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकावर सापळा रचला. पुणे-जयपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी दोघे हरियाणातील असून, एक जण बिहारमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या तुलनेवरून वाद; वर्षभराने सोनू निगमची माफी

एशियन पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत भारताचा डबल धमाका! रिंकूला सुवर्ण, अजित सिंहला रौप्य

प्रज्ञान ओझा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ते

अधारिका फाउंडेशनच्या 'नवदुर्गा पुरस्कारां'नी नऊ दृष्टिहीन महिलांचा गौरव

या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने सोशल मीडियावर एका पोस्टमधून स्वीकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, संशयितांचा या टोळीशी किंवा इतर व्यक्तींशी नेमका काय संबंध आहे, तसेच गोळीबारामागील उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka