Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तेलंगणात विसर्जनावेळी तलावात बुडून ६ मुलांचा मृत्यू

तेलंगणात विसर्जनावेळी तलावात बुडून ६ मुलांचा मृत्यू

NEWS डंका 1 month ago

प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू

गणेशोत्सवाच्या आनंदाला तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेने गालबोट लागले आहे. पेड्डाकंजेर्ला गावात गणपती विसर्जनासाठी नेरेडू चेरुवू तलावावर गेलेल्या सहा मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या या मुलांना तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. विसर्जनादरम्यान ती खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली. मुलांना पोहता येत नसल्याने त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. एकाच वेळी सहा मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गणेशोत्सवाचा आनंद क्षणात दुःखात बदलला आहे.

बुधवारी तीन दिवसांच्या गणपती बाप्पाला देशभरात भक्तिभावाने निरोप देण्यात येत होता. त्याचवेळी पेड्डाकंजेर्ला गावातील काही मुले गणपती मूर्तीच्या विसर्जनासाठी तलावावर गेली होती. विसर्जन करताना सहा मुले पाण्यात उतरली. मात्र, पुढे जात असताना ती नकळत खोल पाण्यात पोहोचली आणि बुडू लागली. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. घटना लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मुलांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले; मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी चंद्रशेखरन यांना ५ वर्षांची मुदतवाढ

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेली सर्व सहा मुले शिरीषा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी होती. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलांच्या मृत्यूची बातमी समोर येताच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला, तर संपूर्ण गाव सुन्न झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka