Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'थाला'चा जलवा थेट फिफापर्यंत

'थाला'चा जलवा थेट फिफापर्यंत

NEWS डंका 2 weeks ago

धोनीला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने क्रिकेटविश्वासह फुटबॉलविश्वातूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

विशेष म्हणजे फिफा विश्वचषकाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटने धोनीला त्याच्या प्रसिद्ध 'थाला' आणि 'नंबर ७' या ओळखीला साजेशा अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

फिफाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिओनेल मेस्सी, किलियन एमबाप्पे आणि एर्लिंग हालांड यांचा फोटो वापरण्यात आला. विश्वचषक २०२६ मध्ये या तिघांनी प्रत्येकी ७ गोल केले असून पोस्टवर '7 Goals. Thala For A Reason. Happy Thala Day!' असे कॅप्शन देण्यात आले. धोनीच्या जर्सी क्रमांक ७ ला दिलेली ही अनोखी मानवंदना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

बीसीसीआयनेही धोनीच्या कारकिर्दीतील कामगिरीचा गौरव करत खास ग्राफिक शेअर केले. ५३८ आंतरराष्ट्रीय सामने, १७,२६६ धावा, यष्टीमागे ८२९ बळी, तसेच २००७ टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार म्हणून त्याच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

धोनीची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जनेही भावनिक व्हिडीओ शेअर करत, 'एक हिरो… जो जगण्याची प्रेरणा बनला. अशी परंपरा जी प्रत्येक पिढीत कायम राहील,' अशा शब्दांत 'कॅप्टन कूल'ला सलाम केला.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी सलामीवीर शिखर धवन आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनीही धोनीच्या नेतृत्वगुणांचे आणि भारतीय क्रिकेटसाठीच्या योगदानाचे कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने १५ वर्षांच्या कारकिर्दीत भारताला तीन आयसीसी जेतेपदे मिळवून दिली. १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिल्यानंतरही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने ५ आयपीएल विजेतेपदे पटकावली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka