Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तिलक वर्माचा धडाका! साऊथ झोन फायनलमध्ये

तिलक वर्माचा धडाका! साऊथ झोन फायनलमध्ये

NEWS डंका 2 weeks ago

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत साऊथ झोनने दमदार कामगिरी करत नॉर्थ झोनचा ७ विकेट्सनी पराभव केला. नॉर्थ झोनने दिलेले १८१ धावांचे लक्ष्य साऊथ झोनने अवघ्या ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज गाठले.

कर्णधार तिलक वर्माने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ झोनला रिकी भुई आणि एन. जगदीशन यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. जगदीशनने ५ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. त्यानंतर रिकी भुईने ४२ धावांची खेळी केली. शेख रशीद मात्र केवळ १ धावेवर बाद झाला.

यानंतर तिलक वर्मा आणि समरण रविचंद्रन यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची नाबाद भागीदारी करत साऊथ झोनला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या तिलकने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करत ७९ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या. त्याच्या खेळीत ८ चौकार होते. समरणने ४ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३२ धावा केल्या.

या सामन्यात नॉर्थ झोनचा पहिला डाव १७५ धावांत आटोपला. कमरान इक्बालने सर्वाधिक ७६ धावा केल्या. साऊथ झोनकडून विद्वथ कावेरप्पाने ४ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात साऊथ झोनने कर्णधार तिलक वर्माच्या ११६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३१२ धावा केल्या आणि ११७ धावांची आघाडी मिळवली. श्रेयस गोपालनेही ८७ धावांचे योगदान दिले. नॉर्थ झोनकडून गुरनूर बरारने ४ विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात नॉर्थ झोनचा संघ २९७ धावांवर ऑलआऊट झाला. सनत सांगवानने ७६, तर आयुष दोसाजाने ५२ धावा केल्या. साऊथ झोनकडून एमडी निधीशने ५६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

या शानदार विजयासह साऊथ झोनने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ६ सप्टेंबरपासून होणाऱ्या अंतिम सामन्यात साऊथ झोनची ईस्ट झोनशी विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka