Dailyhunt
तिरंगाधारी सहा एलपीजी टँकर येतायत भारतात

तिरंगाधारी सहा एलपीजी टँकर येतायत भारतात

NEWS डंका 1 month ago

इराण भारताकडून 'टोल' घेत नाही

श्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हॉर्मुज सामुद्रधुनीतून जाण्यासाठी आणखी सहा भारतीय ध्वजधारी एलपीजी टँकर सज्ज झाले असून विशेष बाब म्हणजे इराण या जहाजांकडून कोणत्याही प्रकारचा 'टोल' आकारत नाही.

मंत्रालयातील विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी माहिती दिली की सर्व सहा टँकर या मार्गातून प्रवास करण्यासाठी तयार असून आंतरराष्ट्रीय सागरी नियमांनुसार हा मार्ग खुला आहे. त्यांनी स्पष्ट केले की इराण भारत-ध्वज असलेल्या जहाजांकडून कोणतेही शुल्क घेत नाही.

दरम्यान, 'जग वसंत' आणि 'पाइन गॅस' हे दोन एलपीजी टँकर सोमवारी (२३ मार्च) यशस्वीपणे हॉर्मुज सामुद्रधुनी पार करून भारताकडे रवाना झाले आहेत. या दोन्ही जहाजांवर सुमारे ९२,००० टन एलपीजी आहे. संवेदनशील क्षेत्रातून जाताना या जहाजांना भारतीय नौदलाच्या युद्धनौकांकडून संरक्षण देण्यात आले. हे टँकर सार्वजनिक क्षेत्रातील बीपीसीएल आणि एचपीसीएल कंपन्यांनी चार्टर केले आहेत आणि ही जहाजं २६ ते २८ मार्चदरम्यान भारतीय बंदरांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' ही जहाजेही सुरक्षितपणे सामुद्रधुनी पार करून सुमारे ९२,७०० टन एलपीजी घेऊन भारतात पोहोचली होती.

इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षामुळे हॉर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या जागतिक ऊर्जा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. भारत आपल्या सुमारे ६० टक्के एलपीजी गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे, ज्यापैकी जवळपास ९० टक्के पुरवठा या मार्गाने होतो. सध्याच्या परिस्थितीत सुमारे ३ लाख टन एलपीजी आणि इतर माल अडकून पडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, सुमारे २० जहाजांवरील ५४० हून अधिक भारतीय खलाशी या भागात अडकले आहेत. त्यांच्या सुरक्षेवर सरकार सतत लक्ष ठेवून असून खाडी देशांच्या मदतीने काही खलाशांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

'अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करतेय'

संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेकडून इराणसमोर १५ कलमी प्रस्ताव; काय आहेत मागण्या?

जम्मू-काश्मीरच्या पुंछमधून पाच फरार आरोपी अटकेत

ट्रम्प-मोदी चर्चा: होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर भर

सरकारच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पातळीवर झालेल्या कूटनीतिक चर्चेमुळे काही भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग मिळाला आहे. या भागात भारतीय नौदलाच्या युद्धनौका तैनात असून त्या जहाजांना सुरक्षा देत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka