Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'टॉक्सिक'ने पहिल्याच दिवशी कमावले १०१ कोटी!

'टॉक्सिक'ने पहिल्याच दिवशी कमावले १०१ कोटी!

NEWS डंका 3 weeks ago

'जवान'सह अनेक मोठ्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला टाकलं मागे

कन्नड सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक : अ फेरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे.

२६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात १०१.१० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यामुळे 'टॉक्सिक'ने शाहरुख खानच्या 'जवान'सह अनेक मोठ्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकलं. मात्र, यशच्याच 'केजीएफ : चॅप्टर २' चा विक्रम अद्याप अबाधित आहे.

'टॉक्सिक'ने भारतात पहिल्या दिवशी १२०.७५ कोटी रुपयांची एकूण, तर परदेशातील कमाईसह १४०.७५ कोटी रुपयांची जगभरातील कमाई केली. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे २४,५७९ शो झाले. समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रियांनंतरही प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

पहिल्या दिवसाच्या निव्वळ कमाईत 'टॉक्सिक'ने 'जवान'च्या ७५ कोटी, 'आदिपुरुष'च्या ८७ कोटी, 'देवरा'च्या ८३ कोटी आणि 'सलार'च्या ९१ कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकलं. मात्र, 'केजीएफ : चॅप्टर २'ने पहिल्याच दिवशी ११६ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे यशच्या सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रम अजूनही 'केजीएफ २'च्याच नावावर आहे.

'टॉक्सिक'ने कर्नाटकातून ३०.५० कोटी रुपये कमावले. आंध्र प्रदेश-तेलंगणातून १८.५० कोटी, तमिळनाडूतून ६.७५ कोटी आणि केरळमधून २.२५ कोटी रुपये मिळाले. दक्षिण भारताबाहेरील भागातून तब्बल ६२.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे यशची लोकप्रियता दक्षिण भारताबाहेरही मोठी असल्याचं स्पष्ट झालं.

चिखल, पाण्याच्या महाकाय तडाख्याने तिबेट, नेपाळमध्ये हाहा:कार, ९५ मृत्युमुखी, १३३ भारतीय बेपत्ता

भारत-फ्रान्स मिळून बनवणार 'अरावली' हेलिकॉप्टर इंजिन

बाब-अल-मंदेबवर भारतीय नौदलाची नजर; दोन जहाजांचा सुरक्षित प्रवास

मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार

प्रदर्शनापूर्वीच 'टॉक्सिक'ची १० लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली होती. ब्लॉक सीट्स वगळता अॅडव्हान्स बुकिंगमधून ५८.२७ कोटी, तर ब्लॉक सीट्ससह ७३.४३ कोटी रुपये जमा झाले. जगभरातील प्री-सेल्समधून सुमारे ८५ कोटी रुपये मिळाले होते. गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक'मध्ये यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता वीकेंडच्या कमाईत हा चित्रपट 'केजीएफ २'चा विक्रम गाठतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka