Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुकाराम मुंढेंची बीएमसीच्या मुख्यालयात धाड, कॅन्टीन सील

तुकाराम मुंढेंची बीएमसीच्या मुख्यालयात धाड, कॅन्टीन सील

NEWS डंका 1 month ago

एफडीएकडे तक्रार करण्यासाठी एक सोपा मार्ग

ध्या अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या यांच्या धाडसत्रांची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे.

याचदरम्यान तुकाराम मुंढे यांच्या एफडीएने आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये धाड टाकली. यानंतर बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीन सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

परवान्यांवरही निलंबनाची कारवाई

तुकाराम मुंढेंच्या एफडीएकडून राज्यभरात अनेक छोट्यांपासून मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. आता एफडीएने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर देखील कारवाई केली आहे. महानगरपालिका कॅन्टीनमध्ये दररोज 7 ते 8 हजारांपेक्षा अधिक लोक जेवून जातात, अशी माहिती आहे. यापूर्वीही FDA ने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवरही निलंबनाची कारवाई केली होती.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेले AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकतो, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

आम्ही दहशतवादी आहोत का म्हणणाऱ्या 'विद्यार्थ्यांच्या' हातात तलवारी, कुकरी

भारतासाठी इशारा; झिम्बाब्वेने नवं अस्त्र बाहेर काढलं!

सगळ्यांच्या पायात एकच काटा ठसठसतोय…

तुमची तक्रार आपोआप तयार होईल

कृत्रिम बुद्धिमत्ता तक्रार आपोआप तयार करते, ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येतो. नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाची उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे, असं तुकाराम मुंढे फेसबुक पोस्ट करत म्हणाले. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला…तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka