Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
त्या अभिनेत्रीने दाखवले मोदींचे अश्लील पोस्टर; गुन्हा दाखल

त्या अभिनेत्रीने दाखवले मोदींचे अश्लील पोस्टर; गुन्हा दाखल

NEWS डंका 0 months ago

भाजपकडून गुन्हा दाखल

नीट (NEET) प्रश्नफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोलकात्यात झालेल्या आंदोलनादरम्यान अभिनेत्री श्रीलेखा मित्रा यांच्या हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित आक्षेपार्ह चित्र असलेले पोस्टर दिसल्याने वाद निर्माण झाला आहे.

या प्रकरणी भाजपच्या नेत्या केया घोष यांनी श्रीलेखा मित्रा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

भाजपने आनंदपूर पोलीस ठाण्यासह बिधाननगर सायबर क्राइम पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली आहे. पंतप्रधानांचे आक्षेपार्ह चित्र सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे हा गंभीर प्रकार असून त्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर केया घोष यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, लोकशाहीत आंदोलन आणि निषेध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणारे पोस्टर हातात घेणे किंवा त्याचे समर्थन करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. आंदोलनादरम्यान पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचाही त्यांनी निषेध केला.

दरम्यान, नीट प्रश्नफुटीच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीलेखा मित्राही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनानंतर त्यांनी सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर केली. त्यापैकी एका छायाचित्रात त्यांच्या हातात वादग्रस्त पोस्टर दिसल्याने हा संपूर्ण वाद उफाळून आला.

'कोक्रॉच' आंदोलनानंतर झाला ६० मेट्रिक टन कचरा

आयटीचा 'पॉवर प्ले'! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी

मालीत भारतीय हिरे व्यापाऱ्याचे अपहरण; ४४ कोटींची 'डील'

२०२७ ठरणार पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष? एल निनोचा प्रभाव कायम

मात्र, श्रीलेखा मित्रा यांनी हे आरोप फेटाळून लावत कोणताही आक्षेपार्ह संदेश देण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, आंदोलनात मोठी गर्दी आणि गोंधळ असल्यामुळे त्यांनी हातातील पोस्टरवरील चित्र पाहिलेच नव्हते. त्यामुळे ते पोस्टर मुद्दाम हातात घेतल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, 'माझा भाजपच्या धोरणांना विरोध असू शकतो, पण कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. पोस्टरवरील चित्र माझ्या लक्षात आलेच नाही. पोलिसांच्या कारवाईमुळे आंदोलनात धावपळ सुरू होती आणि त्या गोंधळात मी ते पोस्टर हातात धरले.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka