दीपके कुटुंबाला 'मातोश्री'चे निमंत्रण
उद्धव ठाकरेंनी अभिजित दीपके आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी येण्याचे निमंत्रणही दिले. अभिजित दिपके यांच्या दिल्लीतील आंदोलनाच्या यशस्वी समाप्तीनंतर छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या घरी विविध राजकीय नेत्यांनी सदिच्छा भेट दिली.
चंद्रकांत खैरे यांच्यासह मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनीही दिपके कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.

