व्हायरल ताप आणि अशक्तपणामुळे उपचार सुरू
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना व्हायरल ताप, अशक्तपणा आणि अतिदगदगीमुळे ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राजकीय बैठका, प्रशासकीय कामकाज आणि सततचा दौरा यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच त्यांना ताप आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागल्याने वैद्यकीय तपासणीनंतर तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
केतनची होणारी पत्नी सिया म्हणत होती, हे लग्न कधीच होणार नाही!
सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय पथकाने त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे नियोजित सार्वजनिक कार्यक्रम आणि राजकीय बैठका रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
अलीकडील काळात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे अत्यंत सक्रिय होते. विविध बैठका, दिल्ली दौरे आणि पक्षसंघटनाशी संबंधित कार्यक्रमांमुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण आला होता. याच सततच्या धावपळीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या असून उपचारांना त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

