Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी

NEWS डंका 3 weeks ago

विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी राज्यात उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजप, ठाकरे गट यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी माजी दिवंगत मंत्री बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत. गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्धीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाची बैठक घेतली आणि यानंतर झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना विधान परिषदेची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. थोड्याच वेळात झिशान सिद्दिकी उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुतोवाच केले होते की, विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत झालेल्या चर्चेत झिशान सिद्दिकी यांचे नाव आघाडीवर आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असताना, पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून सर्व चर्चाना पूर्णविराम लावला आहे.

डीपफेक व्हिडीओ बनवून केला कर्ज व्यवहार; व्यावसायिकाची फसवणूक

तामिळनाडूत पुन्हा स्टॅलिन सरकार?

असममध्ये भाजपाची मोठी आघाडी

ममतांचा थयथयाट, एम फॅक्टर सांगतोय निवडणुकीचा निकाल

विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १२ मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सहा, शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक आणि महाविकास आघाडी एक अशा जागा येणार आहेत. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (१३१ आमदार), शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४० आमदार) अशी संख्या पाहता महायुतीचे नऊ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka