Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विल्सनच्या १९७६च्या बॅचची झाली रियुनियन, शाळेतल्या आठवणींनी चेहरे फुलले

विल्सनच्या १९७६च्या बॅचची झाली रियुनियन, शाळेतल्या आठवणींनी चेहरे फुलले

NEWS डंका 1 month ago

ब्बल ५० वर्षांनी आपल्या मित्रमैत्रिणींना, सुहृदांना भेटण्याचा विलक्षण योग विल्सन हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांसाठी जुळून आला. २९ मार्चला याच शाळेत हा रियुनियनचा कार्यक्रम पार पडला आणि ५० वर्षांपूर्वीच्या त्या शालेय जीवनातल्या आठवणींनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळे हास्य फुलले.

शाळेतले दिवस, शिक्षक, अभ्यास, मजामस्ती सगळ्याच आठवणींना बहर आला. या विद्यार्थ्यांचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे या भेटीला एक वेगळे कोंदण लाभले. पुन्हा एकदा ही सगळी मंडळी एकमेकांना तेव्हाच्या युनिफॉर्ममधल्या अवतारात पाहण्याची कल्पना करू लागले आणि एक वेगळा आनंद सगळ्यांना मिळाला.

विल्सन हायस्कूल मध्ये २९ मार्च रोजी हा सोहळा रंगला. १९७६ला दहावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या री युनियनचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता खास आयोजन समिती बनवली होती. डॉ. संजय गोडबोले, पराग खांड्रे, राजेंद्र हेंद्रे, सुनील कदम, अभय वाईरकर इ. या समितीचे सदस्य होते. त्यांनी कामाची विभागणी केली होती. बऱ्याच वर्षांपूर्वी या बॅचचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या मार्फत, वैयक्तिक ओळखीतून तसेच सोशल मीडिया मार्फत संपर्क करून ५५-६० मित्रमैत्रिणी संपर्कात आले.

रमेश रामू गडे यांनी विशेष प्रयत्न करून बऱ्याच मित्रांना एकत्र आणण्यास मदत केली. तसेच त्यांच्या अर्धांगिनी व इतर पाहुणे मिळून साधारणपणे १०० जणांची कार्यक्रमास उपस्थिती होती. हॉलची सजावट उत्कृष्ट करण्यात आली होती. तसेच पाहुण्यांना भेटवस्तू व मिठाईचे वाटप केले गेले. त्याकरता दिनेश महाडिक व शेखर पाटील यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. २९ मार्चला सकाळी १० ते दुपारी २ अशी कार्यक्रमाची वेळ सुनिश्चित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी महेंद्र कुरघोडे यांनी समर्थपणे पार पाडली. प्रास्ताविकानंतर जमलेल्या सर्व मित्रांनी आपापली ओळख करून दिली.

शेअर बाजारात दमदार उसळी! सेन्सेक्स ५१० अंकांनी वाढला, निफ्टी २३,१०० पार

मेट्रोची 'नऊ'लाई; दहिसर-काशीगाव मार्गामुळे प्रवास आरामात

इराण तणावाचा परिणाम: सोनं ₹१.५ लाखांवर, चांदीतही जोरदार उसळी

नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेत तरंगताना दिसली न्युटेलाची बाटली

संदीप बोर्डे (विल्सन कॉलेजचे माजी प्राध्यापक), किरण आचरेकर (रिटायर्ड सहाय्यक आयुक्त मुंबई मनपा), राजा चौगुले (माजी नगरसेवक मुंबई मनपा), रवींद्र शेट्ये (व्यापारी) इ. यांनी शाळेच्या आठवणी सांगितल्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हेमांगी नामदास (विद्यमान प्राचार्या विल्सन हायस्कूल) तसेच दोन माजी प्राचार्या व ओल्ड बॉईज युनियनचे सदस्य होते. त्यांची ओळख डॉ. संजय गोडबोले यांनी करून दिली. शेखर खातू यांचे गायन व डॉ.अविनाश दामले यांचे मेंडोलीन वादन प्रेक्षकांच्या पसंतीस पडले.

शाळेला दिली खास भेट

कैलास सटाणेकर यांच्या उत्स्फूर्त नृत्याला सगळ्या मित्रमैत्रिणींनी दाद दिली. १९७६ च्या एसएससी बॅचची आठवण म्हणून शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा व खुर्च्या भेट देण्यात आल्या. त्याकरता सर्व मित्रांनी देणगी स्वरूपात रक्कम जमा केली होती. तसेच संगीतामध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी/ विद्यार्थिनीला बक्षीस जाहीर केले गेले. शेवटी प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडले. प्राचार्या हेमांगी नामदास मॅम यांनी शाळेविषयीची सद्यस्थिती व त्यावरच्या उपाययोजना याबद्दल विवेचन केले. त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन राष्ट्रगान झाले. कार्यक्रमा दरम्यान सर्वजण खूप भारावून गेले होते. कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनाने झाली. सर्व माजी विद्यार्थ्यांनी असेच पुन्हा भेटत राहूया, ही इच्छा व्यक्त करून एकमेकांचा निरोप घेतला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka