Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद जाणार? याचिका न्यायालयाने फेटाळली

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद जाणार? याचिका न्यायालयाने फेटाळली

NEWS डंका 2 weeks ago

प्रिया सरवणकर यांना संधी मिळण्याची शक्यता

द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

त्यामुळे राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशाखा राऊत यांनी दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर गुरव यांचा पराभव केला होता.

मात्र, पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवले होते. या प्रक्रियेला आक्षेप घेत विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी २५ ऑगस्ट रोजी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय २० ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार राऊत यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड रद्द झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नगरसेवकपद रद्द झाल्यास पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यासाठी त्या अपात्र ठरू शकतात. ही बाब महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्याची विनंतीही महापालिका आयुक्तांनी केली आहे.

५.५ टन औषधांसह बचाव पथक घेऊन पाचवे विमान नेपाळकडे रवाना

होर्मुझवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण!

अरे बापरे !! अमित ठाकरे थेट मोदींना भिडले

पाकिस्तानची कोती मनोवृत्ती, मोदींचा फोटोच हटवला!

दरम्यान, विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यास निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर गुरव यांना नगरसेवकपदाची संधी मिळू शकते. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला महापालिका राजकारणात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka