Dailyhunt
विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस!

विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस!

NEWS डंका 1 month ago

बीसीसीआय देणार तब्बल १३१ कोटींचे बक्षीस

न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टीम इंडियासाठी तब्बल १३१ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा करून टीम इंडियावर पैशाचा पाऊस पडला आहे.

यापूर्वी भारतीय संघाने २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा विजेत्या संघाला १२५ कोटी रुपये देण्यात आले होते. यंदा बीसीसीआयने त्या तुलनेत ६ कोटी रुपयांनी अधिक बक्षीस जाहीर केले आहे.

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
'आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या यशाबद्दल खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीचे मनापासून अभिनंदन करत बीसीसीआयकडून १३१ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात येत आहे.'

२०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता, तर यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने हा किताब कायम राखला. या विजयासह भारत टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद सलग राखणारा पहिला देश ठरला असून तीन वेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिलाच देश बनला आहे.

हेही वाचा :

'आयुष्यातील सर्वात मोठी चूक' म्हणत सायली सुर्वेने स्वीकारला हिंदू धर्म

इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार 'ब्रह्मोस'! करारावर स्वाक्षरी

बंगळूरूमधील हॉटेल बंदला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर गारद झाला.

या विजयासह भारताला आयसीसीकडून २.३४ मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे २१.५ कोटी रुपये) इतकी विजेत्यांची रक्कम मिळाली, तर उपविजेता न्यूझीलंडला १.१७ मिलियन डॉलर (सुमारे १०.७५ कोटी रुपये) मिळाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka