Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'युद्ध संपलेले नाही'; बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये नेतान्याहूंचा दक्षिण लेबनॉन दौरा

'युद्ध संपलेले नाही'; बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये नेतान्याहूंचा दक्षिण लेबनॉन दौरा

NEWS डंका 1 month ago

इस्रायली सैनिकांना केले संबोधित

स्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी वरिष्ठ लष्करी आणि संरक्षण नेतृत्वासह दक्षिण लेबनॉनला अचानक भेट दिली. बुलेटप्रुफ जॅकेट घालून नेतान्याहू अचानक या भागात पोहचल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

या प्रदेशातील इस्रायली सैनिकांना संबोधित करताना नेतान्याहू म्हणाले की, युद्ध अजून संपलेले नाही. त्यांनी इस्रायलच्या सामर्थ्याबद्दल भाष्य करताना म्हटले की, ज्यू राष्ट्राचे शत्रू आता अस्तित्वासाठी लढत आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार, या दौऱ्यात नेतन्याहू यांच्यासोबत संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ, इस्रायल संरक्षण दलाचे (आयडीएफ) चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल आयल झमीर आणि नॉर्दर्न कमांडचे प्रमुख मेजर जनरल रफी मिलो हे उपस्थित होते.

'मी येथे संरक्षण मंत्री, सरसेनापती, नॉर्दर्न कमांडचे कमांडिंग जनरल, डिव्हिजन कमांडर आणि आमच्या राखीव सैनिकांसोबत आहे. येथे एक अद्भुत उत्साह आणि लढण्याची तयारी आहे- आणि ते चांगल्या प्रकारे लढत आहेत. लेबनॉनमधील सुरक्षा क्षेत्रासह युद्ध सुरूच आहे, जिथे मी तासाभरापूर्वीच होतो,' असे इस्रायली पंतप्रधानांनी सैनिकांना सांगितले. भेटीनंतर, नेतान्याहू सीमेजवळील इस्रायल संरक्षण दलाच्या (आयडीएफ) एका चौकीवर गेले, जिथे गॅलिली डिव्हिजनचे कमांडर ब्रिगेडियर जनरल युवाल गेझ यांनी त्यांना डिव्हिजनच्या कारवायांबद्दल माहिती दिली.

देशाच्या सामरिक उद्दिष्टांवर जोर देत नेतान्याहू यांनी असा दावा केला की, इस्रायलने सुरक्षा क्षेत्र स्थापन करून लेबनॉनकडून होणारे संभाव्य सीमापार आक्रमण यशस्वीपणे रोखले आहे. 'या सुरक्षा क्षेत्रामुळे आपण लेबनॉनकडून होणाऱ्या आक्रमणाचा धोका टाळला आहे, हे आपल्याला दिसत आहे. आम्ही रणगाडाविरोधी हल्ल्यांचा धोका दूर करत आहोत आणि उंच पल्ल्याच्या रॉकेट्सचा सामना करत आहोत, पण अजूनही बरेच काम बाकी आहे. आम्ही प्रचंड काम केले आहे, मोठे यश मिळवले आहे, आणि अजून बरेच काही करायचे आहे, आणि आम्ही ते करत आहोत,' असे ते म्हणाले.

सौदी अरेबियात पाकिस्तानने १३,००० सैनिक आणि फायटर जेट्स पाठवले

नेतान्याहू यांचा एक फोन आणि अमेरिका- इराण चर्चा निष्फळ! नेमकं प्रकरण काय?

इराण-अमेरिका शांतता चर्चेचे अपयश; सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल?

नेतान्याहू पुढे म्हणाले की, 'इथे आपल्याला एक गोष्ट दिसून येते की, आपण मध्य-पूर्वेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. आपले शत्रू - इराण आणि दुष्ट शक्तींचा गट - आपल्याला नष्ट करण्यासाठी आले होते, आणि आता ते केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. हे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसून येते,' असे ते म्हणाले. इस्रायलच्या पंतप्रधानांनी या मोहिमेला 'इस्रायल राष्ट्र आणि इस्रायल संरक्षण दल, आपले नियमित सैनिक आणि आपल्या अद्भुत राखीव सैनिकांसाठी एक मोठे यश' म्हटले. इस्रायलची जनता तुम्हाला सलाम करते, असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka