Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युक्रेन युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर?

युक्रेन युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर?

NEWS डंका 2 weeks ago

पुतिन यांच्या विधानाने शांततेच्या आशा वाढल्या

शिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले भीषण युद्ध आता संपण्याच्या दिशेने जात असल्याचे संकेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत.

मॉस्को येथे झालेल्या विजय दिन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना पुतिन म्हणाले की, 'हा संघर्ष आता शेवटाकडे जात आहे.' त्यांच्या या वक्तव्यामुळे जगभरात पुन्हा शांततेच्या चर्चांना वेग आला आहे.

रशियाने दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या स्मरणार्थ मॉस्कोमध्ये मोठा लष्करी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान पुतिन यांनी युद्धाबाबत महत्त्वाचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धकैद्यांच्या अदलाबदलीवर चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांनी प्रत्येकी एक हजार कैद्यांची सुटका करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात

देशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी

शतायुषी निसर्गप्रेमी डेव्हिड ऍटनबरोंना एका निसर्गप्रेमीच्या अशाही शुभेच्छा!

दरम्यान, अमेरिकेच्या मध्यस्थीने तीन दिवसांचा युद्धविराम लागू करण्यात आला आहे. या काळात दोन्ही देशांनी हल्ले थांबवून शांततेच्या दिशेने चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, युद्धविराम सुरू असतानाही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ल्यांचे आरोप केले आहेत. युक्रेनने रशियाकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचा दावा केला, तर रशियाने सीमावर्ती भागात युक्रेनकडून हल्ले झाल्याचे म्हटले.

पुतिन यांनी पुन्हा एकदा नाटो आणि पाश्चिमात्य देशांवर टीका केली. युक्रेनला नाटोच्या जवळ नेण्याचा प्रयत्न हा रशियाच्या सुरक्षेसाठी धोका ठरल्यामुळेच हा संघर्ष सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, २०२२ मध्ये शांतता कराराची संधी होती, पण पाश्चिमात्य दबावामुळे युक्रेनने तो प्रस्ताव नाकारल्याचेही त्यांनी म्हटले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही युद्धविरामाच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. अमेरिकेच्या पुढाकारामुळे युद्ध समाप्तीच्या हालचालींना वेग मिळाल्याचे बोलले जात आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. जगभरातील अर्थव्यवस्थेवरही या युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हे युद्ध खरोखर संपण्याच्या मार्गावर आहे का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka