Wednesday, 25 Sep, 11.16 am News 18 लोकमत

होम
भाजप नेते चिन्मयानंदवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक

शाहजहाँपूर, 25 सप्टेंबर: माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री चिन्मयानंद याच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला विशेष तपास पथकाने अटक केली आहे. संबंधित मुलीवर चिन्मयानंदकडून 5 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. SITने गेल्याच आठवड्यात पीडित तरुणीचे मित्र संजय, विक्रम आणि सचिन यांना अटक केली होती. मंगळवारी SIT पीडित मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलीला कोर्टात हजर केले जाणार आहे. मंगळवारी पीडित मुलीने अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर 26 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

पीडित तरुणीवर आणि तिच्या 5 मित्रांवर चिन्मयानंदकडून 5 कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुलीच्या जामीनाला चिन्मयानंदच्या वकिलांनी विरोध केला होता. न्यायालयात तब्बल 40 मिनिटे झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने तरुणीचा अर्ज दाखल करून घेतला होता. आता यावर 26 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

SITच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

पीडित तरुणी आणि चिन्मयानंद यांच्यासंदर्भात SITला चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. दोघांच्यात जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2019 दरम्यान 200 फोन झाले आहेत. तर याच काळात तरुणी आणि तिचे मित्र यांच्यात 4 हजार 200हून अधिक वेळा फोन झाल्याचे समोर आले आहे.

व्हिडिओ झाला होता व्हायरल

10 सप्टेंबर रोजी चिन्मयानंद यांना मालिश करत असलेले 16 व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले होते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत तरुणी आणि तिचे मित्र दिसत होते.हे सर्व जण एका गाडीत बसत आहेत असे व्हिडिओ दिसते.SITच्या चौकशीत संजय, सिचन आणि विक्रम यांनी चिन्मयानंदकडून पैसे मागितल्याचे कबूल केले आहे. SIT या सर्वांचे फोन कॉल्स आणि अन्य डिजिटल पुरावे गोळा करत आहेत. तसेच सीसी टिव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top