Monday, 02 Sep, 8.20 am News 18 लोकमत

होम
भारताला आणखी एक यश, कुलभूषण यांना आज मिळणार दुतावासाची मदत

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : कुलभूषण जाधव प्रकरणी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्याला सोमवारी व्हिएन्ना कॉन्व्हेन्शन, आयसीजेचा निकाल आणि पाकिस्तानच्या कायद्याच्या अनुषंगाने भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. कुलभूषण जाधव यांना दुतावासाची मदत मिळणार आहे. जाधव यांना आता दुतावासाची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुलभूषण जाधव हे 2 सप्टेंबर रोजी भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल म्हणाले की, 49 वर्षीय जाधव यांना दुतावास संबंधांवरील व्हिएन्ना अधिवेशन, आंतरराष्ट्रीय न्यायालयीन निर्णय (आयसीजे) आणि पाकिस्तानच्या कायद्यांच्या अनुषंगाने प्रवेश देण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूदंडाची शिक्षा भोगणाऱ्या भारतीय नौदलातील अधिकाऱ्याला दूतावासाची मदत देण्यात आली आहे. तर याआधीही जाधव यांना दूतावास मदतीच्या अटींवरून दोन्ही देशांमधील मतभेदांमुळे 2 ऑगस्ट रोजी नियोजित बैठक होऊ शकली नव्हती.

भारताने तातडीने मदतीसाठी दिल्या सूचना!

कुलभूषण जाधव यांना तातडीने दुतावासाची मदत उपलब्ध करुन देण्यास सांगितलं असून त्यासाठी शेजारील देशाशी संपर्क साधला असल्याचं भारताने गुरुवारी सांगितलं. जुलैमध्ये हेगमध्ये असलेल्या कोर्टाने पाकिस्तानला जाधव यांना कोणत्याही प्रकारचा उशीर न करता दुतावास मदत देण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, 'आम्ही दुतावासाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संपर्क साधत आहोत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधारे आम्ही त्वरित दुतावासाच्या मदतीची मागणी केली आहे. यावर आता पाकिस्तानच्या बाजूने आम्हाला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहूयात' असंही ते म्हणाले होते.

पाकने 2017 मध्ये सुनावली होती फाशीची शिक्षा

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने 'हेरगिरी व दहशतवाद' या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. नौदलातून निवृत्त झाल्यावर जाधव व्यवसायाच्या उद्देशाने गेले असता इराण इथून त्याचं अपहरण केलं गेलं होतं. तर जाधव यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले असल्याचं भारताचं म्हणणं आहे. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

इतर बातम्या - पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला भक्तांची अलोट गर्दी, पाहा LIVE

काय होतं हे प्रकरण?

10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.

इतर बातम्या - ... तर राष्ट्रवादी दिसणारच नाही, अमित शहांचा पवारांवर घणाघात

18 मै 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.

28 डिसेंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top