Tuesday, 05 Nov, 8.11 am News 18 लोकमत

होम
चक्क अंतराळात रंगला बेसबॉलचा सामना! पाहा NASAचा हा भन्नाट VIDEO

बेसबॉल हा खेळ भारतात लोकप्रिय नसला तरी परदेशात हा देश प्रचलित आहे. क्रिकेटसारखाच दिसणारा फक्त नियमांमध्ये अंशत: बदल असलेला हा खेळ इंग्लंड आणि अमेरिकेत सर्वात जास्त खेळला जातो. 1846मध्ये इंग्लंडमध्ये बेसबॉलचा जन्म झाला. जगभरात बेसबॉलची लोकप्रियता खुप आहे. मात्र अंतराळात बेसबॉलचा सामना खेळला जाईल अशी कल्पनाही कोणी केली नसले. पण तसे झाले आहे, नुकतेच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये (आयएसएस) तीन अंतराळवीरांनी चक्क अंतराळात बेसबॉल खेळला.

अंतराळात बेसबॉल खेळण्याचा विचारही कुणी केला नसेल पण असा प्रकार नासाच्या अंतराळवीरांनी केला आहे. आयएसएसच्या तीन अंतराळवीरांनी पृथ्वीपासून 400 किमी लांब या खेळाचा आनंद लुटला. अंतराळ यात्री जेसिका मीर यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात मीर स्वत: चेंडू टाकताना दिसत आहेत. तर, क्रिस्टीना कोच कॅचर झाल्या आहेत. या तिघांनी फ्लॅशलाईटचा वापर करत बॅटिंग केली. या व्हिडीओमध्ये पहिल्या चेंडूवर जेसिका मीरनं कॅच घेतल्याचे दिसत आहे.

गेल्या महिन्यात रचला होता इतिहास

आयएसएसमध्ये बेसबॉल खेळणाऱ्या अंतराळ यात्री जेसिका मीर आणि क्रिस्टीना कोच या त्याच आहेत ज्यांनी गेल्या महिन्यात स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. या दोघांनी जवळजवळ सहा तासात अंतराळात चालण्याची कामगिरी केली होती. कोच यांनी चौथ्यांदा तर मीरनं पहिल्यांदा स्पेस वॉक केले होते.

या गतीनं फिरत आहे आयएसएस

जेसिका मीरनं ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये, 17 हजार 500 किमी प्रति तास गतीनं आंतरराळात फिरत आहे. अंतराळात असणाऱ्या प्रत्येकाला 17 हजार किमी गतीनं प्रवास करावा लागतो. नासाच्या वतीनं अंतराळ संशोधनासाठी आयएसएसची स्थापना करण्यात आली. या योजनेची सुरुवात 1998मध्ये झाली तर 2011मध्ये आयएसएसची निर्मिती झाली. सध्या आयएसएस हा मानवनिर्मित सर्वात मोठा उपग्रह आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top