Thursday, 10 Oct, 9.08 pm News 18 लोकमत

होम
चीनने पाकिस्तानला दाखवला ठेंगा, उधार विमानं द्यायला नकार

बीजिंग, 10 ऑक्टोबर : फ्रान्सने भारताकडे राफेल विमानं सोपवल्यानंतर पाकिस्तान हैराण झाला आहे. पाकिस्ताची मदार चीनवर आहे. त्यासाठी पाकिस्तानने चीनकडे काही विमानं उधार मागितली. पाकिस्तानने चीनकडे एक अपग्रेड रडार आणि एअरक्राफ्ट मागितलं.पण चीनने ही मागणी फेटाळून लावली आहे.पाकिस्तानवर कोट्यवधींचं कर्ज आहे आणि हा देश गरिबीच्या खाईत बुडाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणखी काही उधार देऊन आपली फसगत होईल, असं चीनचं म्हणणं आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर दणका

याआधीही चीनने पाकिस्तानला एक जोरदार धक्का दिला होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या आधी चीनने काश्मीरबद्दल एक भूमिका घेतली होती. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला मुद्दा आहे, असं चीनने म्हटलं होतं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन दिवस चीनचा दौरा केला होता.काश्मीरच्या मुद्द्यावर चीनचं समर्थन मिळेल, अशी इम्रान खान यांना अपेक्षा होती पण तसं काहीच झालं नाही.

(हेही वाचा : 'आमचे पैसे परत द्या', PMC बँकेच्या खातेदारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव)

भारताकडे राफेल विमानं आल्यामुळे आता हवाई दलाची ताकद वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमा सुरिक्षत करण्यासाठी या विमानांचा मोठा उपयोग होणार आहे.

हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, 18 राफेल विमानं अंबालाच्या हवाई तळावर तैनात केली जाणार आहे. तर उरलेली 18 विमानं पश्चिम बंगालच्या हाशिमारा तळावर तैनात असतील.

राज ठाकरेंचा रोख कुणावर? विधानसभा निवडणुकीतलं पहिलं UNCUT भाषण

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top