Sunday, 29 Sep, 8.13 am News 18 लोकमत

होम
काश्मीरवरून पाकने भारतासाठी बंद केली आणखी एक सेवा!

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यावर बंदी घातली. भारतासोबतचा व्यापर देखील बंद केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचा कट करणाऱ्या पाकिस्तानने आता चक्क टपाल सेवाच बंद केली आहे. पाकच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तानमधून भारतात कोणतेही टपाल येणार नाही. यासंदर्भातील माहिती शनिवारी देण्यात आली.

भारतीय टपाल विभागाचे उप-महानिर्देशक अजय कुमार रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमा शुल्क विभागाने 23 ऑगस्ट रोजी एक आदेश काढला होता. या आदेशानुसार पाकिस्तानमधून भारतात सर्व प्रकारच्या टपालांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याआधी पाकिस्तानमधून पाठवली जाणारी पत्र आणि अन्य प्रकाशने सौदी अरब एअरलाइन्सच्या माध्यमातून भारतात पाठवली जात असे. पाकिस्तानचा हा आदेश एकतर्फी आहे. याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरु झाली आहे.

पाकिस्तानकडून अशा प्रकारे घातली जाणारी बंदी म्हणजे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे मत चंचल मनोहर सिंग यांनी व्यक्त केले. यामुळे केवळ पत्रच नाही तर पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध होणारी प्रकाशने, साहित्या देखील भारतात येणार नाही. टपाल सेवा बंद केल्यामुळे सर्व सामान्य नागिरकांना याचा अधिक फाटका बसणार असल्याचे सिंग म्हणाले.

इम्रान खान यांच्या 47 मिनिटांच्या भाषणाला या भारतीय महिला अधिकाऱ्याने 6 मिनिटांत दिलं सडेतोड उत्तर

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचंही भाषण झालं. इम्रान खान यांनी या भाषणात भारतावर एकामागोमाग एक खोटे आरोप केले. आपल्या 47 मिनिटांच्या भाषणात त्यांनी काश्मीर, बालाकोट हल्ला या मुद्यांवर खोट्या कहाण्या सांगत बतावणी सुरू केली.

इम्रान खान यांनी खोटे दावे केल्यामुळे भारताने त्याला उत्तर देण्यासाठी 'राइट टू रिप्लाय' नुसार हक्क मागितला. इम्रान खान यांनी केलेल्या भाषणाला परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रधान सचिव विदिशा मैत्रा यांनी उत्तर दिलं. त्यांनी या भाषणात इम्रान खान यांचा बुरखा फाडला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top