Friday, 13 Sep, 7.32 am News 18 लोकमत

होम
कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का, यासोबत 15 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा थोडक्यात

मुंबई, 13 सप्टेंबर: राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स काल आणि आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात.

1. पाणावलेल्या डोळ्यांनी भाविकांनी 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर' या म्हणत बाप्पाला अखेरचा निरोप दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह मानाच्या गणपतींचं विसर्जन

2. गणपती विसर्जनादरम्यान राज्यभरात 19 भाविकांचा बुडून मृत्यू. मुंबईमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये 41 जण जखमी.

3. महत्त्वाचे नेते आपल्या पक्षात ओढून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा युतीचा प्रयत्न आहे.

वसईतील मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर आणि मनसेच्या माजी नगरसेविका सुषमा ठाकूर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे वसईत मनसेला चांगलाच धक्का बसला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या पक्षांतरामुळे वसईत मनसेची ताकद घटली आहे.

4. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. आठ दिवस पर्लकोटा आणि पामुलगौतम तसेच इंद्रावती नद्यांच्या पाण्याने या तालुक्याला घेरलं होतं. 125 गावं संपर्कहीन होऊन वीजपुरवठा आणि मोबाईलसेवाही बंद पडल्यानं नेमक काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सॅटेलाईट फोनचा वापर करावा लागला. पूरामुळे इथलं अर्थकारणच बिघडल असून सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.

मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडेही लक्ष द्या! गडचिरोलीतल्या पूरग्रस्तांची हाक

5. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. 'एमआयएम'सोबत (MIM)युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा गौप्यस्फोट करत एमआयएम सोबतची युती तुटल्याची कबुली 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी प्रकाश आंबेडकरांनी शुभेच्छा दिल्या.

6. भारतीय निवडणूक आयोगाकडून तीन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाऊ शकते.

7.केंद्र सरकार (Central Government) च्या अंतर्गत येणाऱ्या 10 लाख कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दिवाळीच्या आधी मोठी भेट देण्याची शक्यता आहे. सरकारने हा निर्णय घेतला तर तब्बल 10 लाख अस्थायी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या नव्या नियमांनुसार आता अस्थायी कर्मचाऱ्यांनाही स्थायी कर्मचाऱ्यां एवढाच पगार द्यावा लागणार आहे.

8. जम्मू आणि काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा मोठा कट सुरक्षा दलांनी उधळून लावलाय. कठूआ जवळच्या हायवेर सुरक्षा दलाच्या नाकाबंदीत एका ट्रकमधून तब्बल 6 ए.के. 47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तर तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

9. नासाकडूनही लँडर विक्रमशी संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रोच्या परवानगीनंतर रेडिओ संदेशद्वारे विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

10. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदी विराट कोहली कायम असून अजिंक्य राहणेकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच नवख्या शुभमन गिलला सलामीवीर केलएल राहुलच्या जागी संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला? तारखही निश्चित

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

1. उदयनराजे भोसले 14 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्यात गुरुवारी उदयनराजेंनी शरद पवारांची भेट घेतली या भेटीनंतर उदयनराजेंनी निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

2. कोकणात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष गुहागरचे आमदार भास्कर जाधव आज आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा भास्कर जाधवांकडून करण्यात आला आहे.

3. रामराजे नाईक निंबाळकरही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट करणार आहेत.

4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्प्याचा प्रारंभ होऊन नाशिकला १९ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.

5.पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरबद्दल शुक्रवारी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये एका सभेत ते हा निर्णय जाहीर करणार आहेत. काश्मीरबद्दल पाकिस्तान मध्यस्थांतर्फे चर्चेला तयार आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी सांगितलं. पाकिस्तानची तयारी असली तरी या प्रश्नी मध्यस्थांमार्फत तोडगा काढायला भारत तयार नाही, असंही ते म्हणाले.

6. कुलभूषण जाधव प्रकरणी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा भारतीय दूतावासाची मदत मिळवून देण्यास पाकिस्ताननं दिला नकार. दुसऱ्यांदा मदत देणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top