Thursday, 12 Sep, 7.27 pm News 18 लोकमत

होम
पाकव्याप्त काश्मीरबद्दल इम्रान खान शुक्रवारी करू शकतात मोठी घोषणा

इस्लामाबाद, 12 सप्टेंबर : पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरबद्दल शुक्रवारी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये एका सभेत ते हा निर्णय जाहीर करणार आहेत.

काश्मीरबद्दल पाकिस्तान मध्यस्थांतर्फे चर्चेला तयार आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी सांगितलं. पाकिस्तानची तयारी असली तरी या प्रश्नी मध्यस्थांमार्फत तोडगा काढायला भारत तयार नाही, असंही ते म्हणाले.

भारताने याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधला द्वीपक्षीय मुद्दा आहे, असं भारताने म्हटलं आहे. सीमेवरून होणारे हल्ले आणि भारत - पाक चर्चा हे दोन्ही एकत्र होऊ शकत नाही. जोपर्यंत हे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही हे भारताने स्पष्ट केलं आहे.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, तीन अतिरेकी जेरबंद!

काश्मीरचा संघर्ष ही एक प्रक्रिया आहे,तो घटनाक्रम नाही, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. काश्मीरबद्दल आंततरराष्ट्रीय समुदायामध्ये चिंता वाढते आहे, हेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या प्रमुखांच्या वक्तव्यावरून दिसतं.

काश्मिरी लोकांसाठी प्रत्येक व्यासपिठावर पाकिस्तान आवाज उठवेल, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी म्हटलं आहे. काश्मिरी लोकांच्या हक्काच्या लढाईत ते एकटे नाहीत तर पाकिस्तान त्यांना सातत्याने मदत करेल, असंही त्यांनी सांगितलं. भारताने पाकिस्तानमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष वाढला आहे.

न्यूज18 लोकमतच्या स्टुडिओत बोधनकर यांच्या कुंचल्यातून गणराया LIVE

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top