Friday, 19 Jul, 9.50 am News 18 लोकमत

होम
पावसाळ्यात या शहरांमध्ये फिरण्याचा प्लॅन करू नका, खराब होईल ट्रीप

पावसाळ्यात फिरण्याचे अनेक प्लॅन केले जातात. अनेकदा शहर किंवा राज्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता तिथे फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या शहरात पावसाळ्यात फिरायला जाऊ नका ते सांगणार आहोत.

सिक्कीम- देशातील सर्वात सुंदर जागांपैकी एक म्हणजे सिक्कीम. पण पावसाळ्यात इथली परिस्थिती अत्यंत वाईट असते. इथे एवढा पाऊस पडतो की, सर्वसामान्य अनेक दिवस रस्त्यांवर फिरूही शकत नाहीत.

चेन्नई- पावसाळ्यात चेन्नईला फिरायला जाणं तुमच्यासाठी फारसा चांगला प्लॅन नसेल. या दिवसांत इथे पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. रस्त्यांवर एवढं पाणी जमा होतं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणंही कठीण होतं. त्यामुळे तुम्ही जर चेन्नईचा प्लॅन करत असाल तर दुसऱ्यांदा नक्कीच विचार करा.

उत्तराखंड- उत्तराखंडमधला पाऊस तर साऱ्यांनाच माहीत आहे. इथे पावसाळ्यात जाणं हे धोका पत्करण्यासारखं आहे. ढग फुटी आणि भूस्खलनासाठी हे राज्य ओळखलं जातं. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात इथे ट्रीप प्लॅन करणं टाळाच.

मुंबई- मुंबईची अवस्था थोड्या फार फरकाने चेन्नईसारखीच असते. मुंबईच्या पावसाबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. कुतूहलापोटी अनेकजण मुंबईचा पाऊस पाहायला येतात. पण अनेकदा ते अडकतात.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top