Sunday, 25 Aug, 3.44 pm News 18 लोकमत

होम
राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी वाढवलं सरकारचं टेन्शन, मुख्यमंत्र्यांवरही गंभीर आरोप

मुंबई, 25 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी चौकशीचा सामना करावा लागल्यानंतर मनसैनिक सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियातून मनसेचे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर इतर नेत्यांना टार्गेट करत आहेत.

भाजप आणि शिवसेना सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोप मनसेकडून करण्यात आले आहेत. मनसेने सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप मनसेने केले आहेत.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मनसे अधिक आक्रमक होत सरकारची गोची करणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्राचे आरोपी या टॅगलाईनसह मनसेनं सरकारवर हल्लाबोल केला आहे.

प्रत्येक खात्याचा मंत्री, त्याचा फोटो आणि त्यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अशा आशयाच्या पोस्ट मनसेकडून व्हायरल करण्यात येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top