Tuesday, 24 Sep, 5.19 pm News 18 लोकमत

होम
ट्रम्प यांची काश्मीरबद्दल पुन्हा मध्यस्थीची तयारी, आज होणार मोदी आणि ट्रम्प यांची भेट

न्यूयॉर्क,24 सप्टेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची पुन्हा एकदा तयारी दाखवली आहे. आपण चांगले मध्यस्थ आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर भारताने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होतेय. या बैठकीची वाट पाहू, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ए. गितेश सरमा यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी मोदींची केली स्तुती

ह्यूस्टनमध्ये झालेल्या 'हाउडी मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य आक्रमक होतं, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देत असल्याबद्दल मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता टीका केली होती. ह्यूस्टनच्या या कार्यक्रमानंतर डॉनल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट झाली आणि चर्चाही झाली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने इम्रान खान हेही अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहेत.

काश्मीरवरून तणाव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर मु्द्यावरून मध्यस्थी करण्याबदद्ल ट्रम्प यांनी याआधीही वक्तव्य केलं होतं.काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कायम आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि इम्रान खान हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

PM मोदींना टोला मारण्यास गेलेले शशी थरुर फसले; पाहा काय करून बसले!

डॉनल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी ह्यूस्टनच्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आले होते. आता या दोन नेत्यांची औपचारिक भेट आणि चर्चा होणार आहे. ह्यूस्टनमध्ये या दोघांनीही भारतीय- अमेरिकी नागरिकांना संबोधित केलं होतं.

याआधी G-20 परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉनल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती. त्यावेळी मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशीही चर्चा केली.

फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध, पाहा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top