Tuesday, 17 Sep, 11.45 am News 18 लोकमत

होम
उलट्या काळजाची आई, 9 तासांआधी जन्मलेल्या बाळाला फेकलं काटेरी झुडप्यात!

बब्बू शेख, प्रतिनिधी

मनमाड, 17 सप्टेंबर : निर्दयी मातेने नऊ तास अगोदर जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला काटेरी झुडपात टाकून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव तालुक्यातील गाळाने-चिंचवे इथं समोर आला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला रडण्याचा आवाज आल्यानंतर त्याने या अर्भकाला पोलिसांच्या मदतीने वडणेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर या अर्भकावर तातडीने उपचार करण्यात आले असून सध्या हे बाळ सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पळ काढलेल्या मातेचा शोध घेत आहेत. खरंतर पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातलं हे भीषण वास्तव आहे. एकीकडे स्त्रीयांना प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थान, बेटी बचाओचे नारे तर दुसरीकडे या आईला 9 तासंही पोटचं लेकरू बघवलं नाही.

स्त्रीत्वाचा जागर करणारी आईच जेव्हा असं वागते तेव्हा समाजापुढे नेमका कोणता आदर्श आपण ठेवतो हे लक्षात घेतलं पाहिजे. याआधी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यावर वेगवेगळ्या पातळींवर जनजागृती करण्यात आली. पण त्यातून या समाजाने खरंच बोध घेतला का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या - 'दादा-दादा' म्हटल्यावरही नराधमांनी ओरबाडलं, तरुणीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार

'दादा-दादा' म्हटल्यावरही नराधमांनी ओरबाडलं, 22 वर्षाच्या तरुणीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार

गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बलात्काराची अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घडना घडली आहे. एका 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बागेमध्ये फिरायला आलेल्या तरुणीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या पीडित तरुणी रुग्णालयात उपचार घेत असून तिची स्थिती अतिशय नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - युतीवर वाद अद्याप मिटला नाही, शिवसेनेनं दिला नवा फॉर्म्युला!

बागेत फिरायला गेलेल्या 22 वर्षाच्या तरुणीवर 4 नराधमांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पीडित तरुणीला रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं. पण पीडितेला शुद्ध आल्यानंतर ती सारखी बेशुद्ध पडत आहे तर तिला मोठा मानसिक धक्का बसला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे आपल्या देशात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली कुठेही सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

नवी दिल्लीतील सराय काले खां (Sarai Kale Khan) इथे बस स्थानकाजवळील इंद्रप्रस्थ पार्क (Indraprastha Park) मध्ये हा प्रकार घडला आहे. अत्याचार होत असताना तरुणीने प्रचंड आरडाओरड केली. 'मुझे छोड दो भैय्या' अशा अनेक विनवण्या केल्या पण तिचं कोणीही ऐकलं नाही किंवा कोणीही मदत केली नाही.

इतर बातम्या - BREAKING: काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर उचलणार मोठं पाऊल!

स्थानिक पोलीस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, प्रकरण सनलाईट कॉलनी परिसरातील आहे. पोलिसांनी अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना पकडण्यासाठी सात पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलीची मानसिक प्रकृती ठीक नाही. तिला सध्या काहीही सांगता येत नाहीये. पीडित तरुणी 22 वर्षांची आहे. या घटनेने तरुणीला मोठा धक्का बसला आहे. 'मुझे छोड़ दो भैया...मुझे छोड़ दो' असं ती सारखं बडबडत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top