Sunday, 29 Sep, 12.07 pm News 18 लोकमत

होम
UN मध्ये इमरान खानना सडेतोड उत्तर देत निष्प्रभ करणारी दुर्गा, VIDEO

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत भारताच्या पराराष्ट्र सचिव विदिशा मैत्रा म्हणाल्या की, इमरान खान यांचे भाषण तिरस्काराने भरलेले होते. तसेच त्यांचे प्रत्येक वाक्य खोटं होतं. विदिशा यांनी पाकिस्तानला उत्तर देताना दुर्गावतार धारण केला होता. त्यांचे भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विदिशा यांनी म्हटलं की, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा चुकीचा वापर केला. मानवाधिकाराची चर्चा करणाऱ्या पाकिस्तानने त्यांच्याच देशात काय स्थिती आहे ते बघावं. तिथं अल्पसंख्यांकांची स्थिती वाइट आहे. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. 1947 ला 23 टक्के अल्पसंख्यांक होते ते आता फक्त 32 टक्के इतकेच उरले आहेत.

पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याचं याआधी अनेक देशांनी म्हटलं होतं. त्यावरूनही विदिशा यांनी प्रश्न उपस्थित केला. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पाकिस्तान पेन्शन देते. लादेनला उघडपणे वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून मानवाधिकाराबद्दल काही ऐकायचं नाही. इमरान खान संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या 130 दहशतवाद्यांना नाकारू शकतात का? असंही त्या म्हणाल्या. पाकिस्तान दहशतवादावर तर आम्ही विकासावर भर देत आहे. पाकिस्तानने 1971 आणि नियाजीला विसरू नये असंही विदिशा यांनी म्हटलं.

पाकिस्तान मुद्द्यावरून इमरान खान यांना उत्तर देणाऱ्या विदिशा मैत्रा संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या सचिव आहेत. याशिवाय त्या यूएन मिशनमध्ये भारताच्या नव्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. विदिशा 2008 मध्ये नागरी सेवा परिक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. नागरी सेवा परीक्षेत त्यांनी 39 वे स्थान पटकावले होते. तसेच 2009 मध्ये प्रशिक्षणावेळी बेस्ट ट्रेनिंग ऑफिसरचा पुरस्कारही पटकावला होता. त्यांच्याकडे सध्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची जबाबदारी आहे. तसेच सिक्युरिटी काउन्सिलची प्रकरणेही त्या बघतात.

विदिशा यांनी इम्रान खान यांना नियाजी कधीही विसरू नका असं म्हटलं. त्यानंतर नियाजी ट्विटरवर ट्रेंडमध्ये आले होते. 1971 च्या युद्धात पाकिस्तानचा जनरल नियाजीने भारतासमोर गुडगे टेकले होते. विदिशा यांनी नियाजीचा उल्लेख करून इमरान कान यांना पाकिस्तानी जनरलच्या आत्मसमर्पणाची आठवण करून दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top