Wednesday, 07 Aug, 2.50 am News 18 लोकमत

होम
'या' 20 गोष्टींमुळे सुषमा स्वराज यांना तुम्ही कधीही विसरू शकणार नाही!

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश

शोकसागरात बुडाला आहे. सुषमा स्वराज या देशातल्या सगळ्या पहिला कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या पहिला कॅबिनेट मंत्री बनण्याचा मानही सुक्षमा स्वराज यांनी पटकावला.

सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

सुषमा स्वराज या सभागृहाचा पहिल्या महिला विरोधी पक्षनेता राहिल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांविरूद्ध सुषमा स्वराज यांनी मोर्चा सांभाळला.

कुलभूषण जाधव यांच्या केसला सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं.

चीनसोबत डोकलामच्या झालेल्या तनावानंतर त्यांच्यातील भांडणं संपवण्यामध्ये सुषमा स्वराज यांची महत्त्वाची भूमिका होती.

परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी 90 हजार लोकांची मदत केली आहे. ट्वीटरद्वारे त्यांनी प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्वरित पासपोर्ट योजना सुषमा स्वराज यांच्यामुळे सुलभ झाली. पहिले 7 दिवस आणि त्यानंतर तीन दिवसांनी पासपोर्ट मिळण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली.

संयुक्त राष्ट्राच्या 191 पैकी 186 देशांमध्ये त्यांनी त्यांची छबी उमटवली.

2004मध्ये सर्वश्रेष्ठ खासदार असल्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या.

ट्वीटरवर सर्वात जास्त फॉलोअर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या.

संसदेच्या कामाचं टीव्हीवर लाईव्ह प्रसारण सुषमा स्वराज यांनी सुरू केलं.

सुषमा स्वराज यांनी बॉलीवुडला इंडस्ट्री म्हणून घोषित केलं होतं.

स्वास्थ्य मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी देशभर 6 नवीन एम्स सुरू केले.

सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानात अडकलेल्या हामिद अंसारी याची वतन वापसी केली.

15 वर्षाच्या गीताला पाकिस्तानमधून परत आणण्यात आणि नंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांना शोधण्यात स्वत: मदत केली.

सुदान आणि लीबियामध्ये अडकलेल्या 150 लोकांना परत आणण्यात महत्त्वाची भूमिका

परराष्ट्र मंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सुषमा स्वराज या पहिल्या महिला आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top