Wednesday, 20 Jan, 12.41 pm Newschecker मराठी

बातम्या
कर्नाटकातील मिनी बस अपघातात 17 महिला डाॅक्टरांचा मृत्यू झालेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

कर्नाटकातील मिनी बस अपघातात 17 महिला डाॅक्टरांचा मृत्यू झाला असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोव्याला जाताना दावणगिरी मेडिकल असोसिएशनच्या लेडिज विंगच्या टूर बसला अपघात झाला असून यात 17 डाॅक्टर जागेवर मृत पावले असून 3 ते 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. अंत्यंत दुर्देवी घटना. यातील सर्व महिला डाॅक्टर बहुतेक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.

संग्रहित

संग्रहित

Fact Check / Verification

कर्नाटकातील 17 महिला डाॅक्टरांचा अपघातात मृत्यू झाला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगल सर्च केले असता आम्हाला दैनिक लोकमतची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, पिकनिकसाठी निघालेल्या एस के पाॅल स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांंच्या बसचा आणि ट्रकचा अपघात झाला यात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

या अपघाताबद्दल अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता दैनिक जागरणची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, धारवाड येथे टिपर आणि मिनीबसचा अपघात झाला यात 10 महिला आणि एका चालकाचा जागीच मृत्यू झाला. या सर्व महिला दावणगिरी येथील महिला कल्बच्या सदस्य असल्याचे समजते. जखमींवर हुबळी येथील हाॅस्पिटलमध्ये इलाज सुरु आहे.

याशिवाय आम्हाला The Hindu या इंग्रजी वतर्मानपत्राच्या वेबसाईटवर या अपघाताची बातमी आढळून आली. ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील सर्व महिला गोव्याला गेट टुगेदरसाठी जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कृष्णकांत यांनी दिल्याचे बातमीत म्हटले आहे.

मात्र वरी पैकी कोणत्याही बातमीत या सर्व महिला डाॅक्टर असल्याची माहिती आढळून आली नाही. मात्र पोलिस अधिक्षक कृष्णकांत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी सेंट पाॅल स्कूलच्या माजी विद्यार्थिनींच्या बसला अपघात झाला. या बसमध्ये दोन ड्रायव्हसहित 18 लोक होते. अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला ज्यात 9 महिला आणि 2 ड्रायव्हरांचा समावेश आहे. 7 लोक जखमी असून त्यांचावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एका डाॅक्टरचा देखील मृत्यू झाला त्या जेएमएण काॅलेजमध्ये गायनोकाॅलोॅजीच्या प्रोफरेसर होत्या. महिलांच्या या ग्रुपमध्ये हीच एकमेव डाॅक्टर होती. 17 डाॅक्टरांच्या मृत्यूचा दावा चुकीचा आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, कर्नाटकातील मिनी बस डंपर अपघातात 17 नाही तर एक महिला डाॅक्टरचा मृत्यू झाला आहे.

Result - Misleading

Our Sources

lokmat- https://www.lokmat.com/national/reunion-plan-turns-tragic-11-die-road-accident-a597/

The Hindu- https://www.thehindu.com/news/national/karnataka/reunion-plan-of-school-alumni-turns-tragic/article33581484.ece

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Author

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Newschecker.in Marathi
Top