Saturday, 28 Mar, 11.49 am न्यूजटाऊन

होम
धोका वाढू लागलाः मुंबई-नागपुरात आढळले ६ नवे रूग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या १५९

मुंबईः महाराष्ट्रावरील कोरोना विषाणूचे संकट वाढत चालले असून काल मुंबईत ५ आणि नागपुरात १ असे सहा नवे रूग्ण आढळल्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५९ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

१८ जानेवारीपासून आजपर्यंत राज्यात ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ३४९३ जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यांपैकी आजपर्यंत ३०५९ जणांचे प्रयोगशाळा नमुन कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर १५९ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६,५१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १०४५ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रूग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी हिंदुजा रूग्णालयात एका ८२ वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका दीडवर्षांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NewsTown Marathi
Top