Friday, 27 Mar, 1.49 am न्यूजटाऊन

समाज
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार

संग्रहित छायाचित्र.

मुंबई : कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या संकटप्रसंगी सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेचे विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार, लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार आपले एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तर शिवसेनेच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला, शेती व उद्योगधंद्यावरही मोठे संकट ओढवले. या अभूतपूर्व संकटावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सहाय्यता निधीला हातभार लागावा म्हणून राज्य विधिमंडळातील विधानसभा व विधान परिषद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर लोकसभा व राज्यसभेतील सदस्यांचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. हे धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करण्याचे निर्देशही त्यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दिले आहेत.

दुसरीकडे शिवसेनेनेही आपल्या आमदार- खासदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सर्वोतोपरीने सहाय्य करीत आहेत. या लढाईत आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत, असे देसाई म्हणाले. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे संबंधितांनी धनादेस जमा करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NewsTown Marathi
Top