Friday, 27 Mar, 11.23 am न्यूजटाऊन

होम
सर्व प्रकारची कर्जवसुली तीन महिने स्थगित कराः भारतीय रिझर्व्ह बँकेचा बँकांना सल्ला

मुंबईः कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्जाची वसुली तीन महिने स्थगित करा, असा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना दिला आहे. कोरोनामुळे जगभरात मंदी येणार आहे. त्याचा प्रतिकुल परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होणार आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटल आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या घोषणा केल्या. त्यावेळी शक्तिकांत दास यांनी बँकांना हा सल्ला दिला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्के कपातीचीही घोषणा केली. त्यामुळे गृह, वाहन यासह सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. या कपातीमुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली ही आतापर्यंत सर्वात मोठी कपात आहे. याशिवाय अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे होम, कार, गृह व इतर कर्जासह अनेक प्रकारचे ईएमआय भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे दास म्हणाले. देशातील बँकिंग व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वासही दास यांनी देशवासियांना दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NewsTown Marathi
Top