Tuesday, 04 Aug, 10.02 pm नुसता Dhingana

बॉलीवूड
सुशांतच्या अकाऊंटमधून काढण्यात आले तब्बल 50 कोटी रुपये; मुंबई पोलिसांनी याकडे कशामुळे केलं दुर्लक्ष?

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असा वाद रंगला आहे. हा वाद आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुशांतच्या वडिलांच्या व्हिडीओमुळं आता आणखी एका मुद्द्यावर चर्चा रंगली आहे. सुशांतच्या सुरक्षेबाबत फेब्रुवारीमध्येच त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्याचं त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं होतं. यानंतर बिहारच्या डीजीपींनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.

गुप्तेश्वर पांडेय म्हणाले, 'सुशांतच्या अकाऊंटमध्ये गेल्या 4 वर्षात तब्बल 50 कोटी आले आणि आश्चर्य म्हणजे हे पैसे काढले गेले. 1 एका वर्षात त्याच्या अकाऊंटला 17 कोटी रुपये आले आणि त्यातून 15 कोटी रुपये काढण्यात आले. यावर चौकशी होणं गरजेचं नव्हतं का ?' असा सवाल उपस्थित करत अशा अनेक मुद्द्यांना दाबण्यात आलाचा आरोपही त्यांनी केला आहे. निर्भीड आणि स्पष्टवक्ता अधिकारी अशी पांडेय यांची ओळख आहे.

एसपी विनय तिवारी हे रविवारी बिहार पोलिसांच्या टीमला लिड करण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. पालिकेनं मात्र त्यांना क्वारंटाईन केलं. या गोष्टीची खूप चर्चा झाली. यावर बिहार पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. सुशांतच्या केसमधील कोणताही रिपोर्ट दिला जात नाही असा आरोपही बिहार पोलिसांनी केला आहे. अशा प्रकारचा असहयोग आम्ही कोणत्याही राज्यात पाहिला नाही असंही ते यावेळी म्हणाले.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nusta Dhingana
Top