Friday, 18 Oct, 3.14 am वन इंडिया एक्सक्लूसिव्ह

एक्सक्लूसिव्ह
कल्याण ज्वेलर्सतर्फे दिवाळीनिमित्त भरघोस सवलती आणि भेटवस्तू

भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात पसंतीचा दागिने ब्रँड असलेल्या कल्याण ज्वेलर्सने दिवाळीसाठी आकर्ष आणि भव्य योजना जाहीर केल्या असून त्यात जगभरातील ग्राहकांना तीन लाख सोन्याची नाणी मिळणार आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून कल्याण ज्वेलर्सने वीकली रॅफल ड्रॉद्वारे भेटी देण्याचे आश्वासन दिले असून एका भाग्यवान विजेत्याला कल्याण ज्वेलर्सकडून 100 सोन्याची नाणी जिंकता येणार आहेत.  या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांवरील घडणावळ म्हणजेच व्हॅल्यू अडिशन्स किंवा व्ही 199 रुपयांपासून सुरू होईल.

त्याशिवाय ग्राहकांना 8 ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्याच्या खरेदीवर एक हजार रुपयांची सवलत आणि स्टडेड दागिन्यांच्या खरेदीवर सोन्याची नाणी मोफत दिली जाणार आहे. 

कामाच्या ठिकाणी घालण्यासारख्या हिऱ्यांच्या दागिन्यांपासून नववधूच्या दागिन्यांपर्यंत डिझाइन्सची मोठी श्रेणी कल्याण ज्वेलर्सकडे उपलब्ध आहे.

ब्रँडने या दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी भव्य हिरे विक्री योजनाही जाहीर केली असून त्यात कल्याण ज्वेलर्सच्या सर्व दालनांत हिऱ्यांच्या दागिन्यांवर 20 टक्क्यांची सवलत मिळणार आ हे. ही ऑफर 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत खुली आहे.

याप्रसंगी कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. टीएस कल्याणरामन म्हणाले, दिवाळी म्हणजे समृद्धी आणि नवी सुरुवात. म्हणूनच नव्या दागिन्यांच्या खरेदीसाठी हा शुभ  काळ मानला जातो. या सणामागची भावना लक्षात घेत आही सर्वोत्तम दागिने आणि असामान्य अनुभवाबरोबरच चांगल्या ऑफर्सही देत असतो. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही ग्राहकांना चांगल्या सवलतींचा लाभ मिळवून देत मदत करण्याचे ध्येय ठेवले असून या सवलतीमुळे सणांचा आनंद द्विगुणित होत असतो.

त्याशिवाय ग्राहकांना आता सोन्याच्या दागिन्यांवर नवे चार स्तरीय हमी प्रमाणपत्राचे फायदेही मिळवता येणार आहेत. निष्ठावान ग्राहकांप्रती असलेली ब्रँडची बांधिलकी उंचावण्यासाठी कल्याणने हा खास उपक्रम हाती घेतला आहे. कल्याण ज्वेलर्समधे विकल्या जाणाऱ्या दागिन्यांवर विविध प्रकारच्या शुद्धता चाचण्या केल्या जात असल्या आणि सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क दिलेले असले, तरी चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांना खरेदी पावतीमध्ये नमूद केलेल्या शुद्धतेचे मूल्य ते दागिने बदली किंवा पुनर्विक्री करताना देण्याची खात्री देते. त्याशिवाय यामध्ये कल्याण ज्वेलर्सच्या देशभरातील दालनांमध्ये दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल करून दिली जाते. 

दालनामध्ये ब्रँड समकालीन आणि पारंपरिक मोतिफ्स असलेल्या नाजूक दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करण्यात येणार असून त्यात कर्णभूषणे, बांगड्या आणि गळ्यातल्या हारांचा समावेश असेल. कंपनीद्वारे आपल्या ग्राहकांना मुहूरत ही नववधूच्या देशभरातील प्रचलित दागिन्यांची श्रेणी त्याचबरोबर कल्याणचे लोकप्रिय हाउस ब्रँड्स उदा. तेजस्वी – पोल्की दागिने, मुध्रा – हाताने बनवलेले प्राचीन प्रकारचे दागिने, निमाह- टेंपल ज्वेलरी, ग्लो- डान्सिंग डायमंड्स, झियाह – सोलेटेयरसदृश हिऱ्यांचे दागिने, अनोखी – अनकट हिरे, अपूर्वा – खास प्रसंगांसाठी हिरे, अंतरा – लग्नासाठीचे हिरे आणि हेरा – दैनंदिन वापराचे दागिने आणि रंग – प्रेशियस स्टोन्सचे दागिने यांचा समावेश असेल.

कल्याण ज्वेलर्सबद्दल
केरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील

वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. 1993 मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत. कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून 141 दालने कार्यरत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Oneindia Exclusive Marathi
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>