Dailyhunt
Cancer: अचानक ताप अन् थकवा जाणवतो? ही कॅन्सरची लक्षणे नाहीत ना? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Cancer: अचानक ताप अन् थकवा जाणवतो? ही कॅन्सरची लक्षणे नाहीत ना? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Pune

न्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची गरज असते. मग आपण लगेच पाणी पितो. कारण आपला घसा कोरडा होतो. कधीकधी आपल्याला उचकी लागते. तसेच काही गंभीर आजार असतात.

जर त्यांच्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर तुम्हाला भविष्यात जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागू शकतं.

जर तुम्ही कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते. वेळेवर निदान झालं तर कॅन्सरवर उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते, पण अनेकजण सुरुवातीची चिन्हे नॉर्मल समजून दुर्लक्ष करतात आणि हीच चूक पुढे गंभीर ठरते.

अचानक वजन कमी होणं हे कॅन्सरचे एक महत्त्वाचं लक्षण मानले जातं. कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता काही महिन्यांत वजन झपाट्याने घटत असेल, तर ते चिंतेचं कारण असू शकतं. शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी ऊर्जा वापरून वाढतात, त्यामुळे मेटाबॉलिझम बदलतो आणि वजन कमी होतं. त्याचप्रमाणे सतत थकवा जाणवणं सुद्धा गंभीर संकेत असू शकतो. पुरेशी झोप घेतल्यानेही थकवा जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

सतत ताप येत असेल तो दुर्लक्षित करु नका. कोणताही संसर्ग नसताना सतत ताप येत असेल, तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याचे संकेत असू शकतात. कारण रक्ताच्या कॅन्सरमध्ये हे लक्षण सुरुवातीपासून दिसू शकतं. तसेच शरीरात सतत वेदना होणे, विशेषतः स्नायू किंवा सांध्यांमध्ये, हेही धोक्याचं चिन्ह असू शकतं. पाठदुखी, डोकेदुखी किंवा हाडांमध्ये वेदना कायम राहिल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही प्रकारच्या कॅन्सरची ही सुरुवात असू शकते.

टीप: शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक तपासण्या करणे हेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचावाचे महत्त्वाचे पाऊल ठरते.

Pune

उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची गरज असते. मग आपण लगेच पाणी पितो. कारण आपला घसा कोरडा होतो. कधीकधी आपल्याला उचकी लागते. तसेच काही गंभीर आजार असतात. जर त्यांच्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर तुम्हाला भविष्यात जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागू शकतं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PCMC tahalaka