Dailyhunt
जेलमधून आल्यावर पाहिलं- घर उद्ध्वस्त, खोक्या भोसलेला भावना अनावर

जेलमधून आल्यावर पाहिलं- घर उद्ध्वस्त, खोक्या भोसलेला भावना अनावर

Pune

का व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याच्या आरोपात बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसले याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्याने हरणाची शिकार करून मांस शिजवून खाल्ल्याचेही आरोप झाले.

परंतु या सर्व आरोपातून पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली. दरम्यानची दीड वर्षे सतीश भोसले बीडच्या कारागृहात होता. याच काळात त्याच्यावर विविध आरोप झाल्याने प्रशासनाने सतिश भोसले याचे घर जमीनदोस्त केले. तुरुंगातून सुटून आल्यानंतर घराची विदारक अवस्था पाहून खोक्या भोसले भावविवश झाला.

माझ्या प्रकरणात जे सत्य होते, ते समोर आले. कोणतेही पुरावे न आढळल्याने न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली. न्यायदेवतेवर माझा विश्वास होता. न्यायदेवतेचे मी आभार मानतो. पण गेल्या दोन वर्षात मी बरबाद झालो. माझी सगळी कमाई गेली, अशा शब्दात त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

माझे वडील ८० वर्षांचे, त्यांना राहण्यासाठी आता घर नाही

गेल्या दोन वर्षात माझे कुटुंब रस्त्यावर आले. माझे वडील ८० वर्षांचे आहेत, त्यांना राहण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छत नाही. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आहे. परंतु ह्या लोकांनी आमच्याकडून हेच हिसकावून घेतले, असे उद्विग्नपणे खोक्या भोसले म्हणाला.

माझे व्हायरल झालेले व्हिडीओ बनावट

माझे व्हायरल झालेले व्हिडीओ बनावट होते. मला टार्गेट करण्यात आले. वड्याचे तेल वांग्यावर काढले गेले. माझ्यावर माझ्या कुटुंबावर अन्याय केला गेला. माझ्यावर अन्याय झाला याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, मला न्याय द्यावा, अशी मागणी त्याने केली.

खोक्या भोसले कोण आहे?

काही महिन्यांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा झाला होता. झाल्यानंतर त्याच्यावर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. काल बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, प्राणघातक हल्ला, जबरदस्तीने संपत्ती मिळणं, धमकी देणं, फसवणूक, खोटी कागदपत्र बनवणं, खोटे पुरावे सादर करणे.... असे आतापर्यंत त्याच्यावर आरोप झाले, याच आरोपान्वये त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल आहेत. खोक्या भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. साधारण वर्षभरापूर्वी त्याने एका व्यक्तीच्या तळपायावर बॅटने अमानुषपणे मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Pune

एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याच्या आरोपात बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसले याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्याने हरणाची शिकार करून मांस शिजवून खाल्ल्याचेही आरोप झाले.

माझे वडील ८० वर्षांचे, त्यांना राहण्यासाठी आता घर नाही

माझे व्हायरल झालेले व्हिडीओ बनावट

खोक्या भोसले कोण आहे?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PCMC tahalaka