Dailyhunt
Pune News: पुण्यातील अनधिकृत इंटरनेट केबल रडारवर; महापालिकेकडून कारवाई ; 'वर्क फ्रॉम होम'ला फटका

Pune News: पुण्यातील अनधिकृत इंटरनेट केबल रडारवर; महापालिकेकडून कारवाई ; 'वर्क फ्रॉम होम'ला फटका

Pune

पुणे शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबलविरोधात महापालिकेने कारवाई सुरू करण्यापूर्वी केबल व्यावसायिकांशी अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यांना सुधारणा करण्यासाठी काही प्रस्तावही दिले होते.

मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

आता महापालिकेने अनधिकृत केबलवर कारवाई सुरू केल्याने इंटरनेट बंद पडून त्याचा थेट फटका 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या नोकरदारांना बसला आहे. कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पुणे शहरात हजारो किलोमीटर लांबीच्या अनधिकृत ओव्हरहेड केबल आहेत. यातून सुमारे १० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. चार वर्षांपूर्वी यासंदर्भातील प्रस्ताव आला होता. पण तो बारगळला. आता पुन्हा महापालिकेने बेकायदेशीर ओव्हरहेड केबलवर कारवाई सुरू केली आहे. केबल व्यावसायिकांनी महापालिकेला शुल्क भरावे आणि भूमिगत केबल टाकून घ्याव्यात, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली आहे.

वीजयंत्रणेला धोका

दरम्यान, महापालिकेने सातारा रस्ता, पुण्याईनगर आणि धनकवडी परिसरात सलग तीन दिवस कारवाई केली. यात दोन ट्रक भरून केबल जप्त केल्या आहेत. त्याचा फटका या भागातील इंटरनेट, टीव्ही नेटवर्कला बसला आहे. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अजूनही वर्क फ्रॉम होम देत आहेत. पण या कारवाईमुळे इंटरनेट सेवा बंद झाल्याने नोकरदारांची तारांबळ उडाली आहे. यासंदर्भात विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली. ''केबल कंपन्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी नियमांचे पालन केले नाही. अनेक ठिकाणी केबल धोकादायक पद्धतीने टाकल्याने वीज यंत्रणेलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कारवाई सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

"१० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुमारे १० हजार किलोमीटरपेक्षा जास्त अनधिकृत केबल शहरात आहेत. या व्यावसायिकांनी महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडविले आहे. यापूर्वी त्यांना नोटिसा दिल्या होत्या. पण आता महापालिका कठोर कारवाई करणार, स्वतःहून केबल काढली नाही, तर गुन्हे दाखल केले जाणार आहेत."

- श्रीनाथ भिमाले,

अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका

Pune

पुणे शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबलविरोधात महापालिकेने कारवाई सुरू करण्यापूर्वी केबल व्यावसायिकांशी अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यांना सुधारणा करण्यासाठी काही प्रस्तावही दिले होते.

मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

वीजयंत्रणेला धोका

- श्रीनाथ भिमाले,

अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PCMC tahalaka