Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणेकरांची पाण्याची चिंता कमी! धरणसाखळीत महिनाभराचा अतिरिक्त पाणीसाठा

पुणेकरांची पाण्याची चिंता कमी! धरणसाखळीत महिनाभराचा अतिरिक्त पाणीसाठा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. यामुळे पाणीसाठ्यात वाढ सुरूच असून मागील तीन दिवसांत धरणात महिनाभराचा पाणीसाठा वाढला आहे.

शहरातील पालखी सोहळ्यासाठी महापालिकेने दोन दिवस पाणीकपात रद्द केलेली आहे. वाढलेल्या पाणीसाठ्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे.

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळेही पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३ मिमी पावसाची नोंद झाली. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३३ मिमी, वरसगाव धरण परिसरात ३० मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५५ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळयात पहिल्यांदाच टेमघर धरणातही पाणी साठण्यास सुरूवात झाली.

शहरास महिन्यासाठी १ टीएमसी पाणी लागते. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपूर्वी ३.५७ टीएमसी पाणीसाठा होता. तो वाढून पावसामुळे ४.६८ टीएमसी झाला आहे. त्यामुळे तीनच दिवसात जवळपास एक टीएमसी पाणी वाढले असून शहराला ते महिनाभर पुरेल एवढे आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा जवळपास १३ टीएमसीने कमी आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा १८ टीएमसी होता. त्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असला तरी जुलै महिन्यात समाधानकारक पाणीसाठा तयार होण्याची अपेक्षा आहे.

धरणांतील पाणीसाठा

-खडकवासला - ०.३० टीएमसी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PCMC tahalaka