Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या.

आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या.

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आयुष कोमकर (वय १९) याची काही दिवसांपूर्वी निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता.

वनराज आंदेकर चा मारेकरी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळीबार करत कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे.

पुणे शहरात पुन्हा एकदा आज (शनिवार) गोळीबाराची घटना घडली. कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गोळीबार करण्यात आला आहे. गणेश काळे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील समीर काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

पुणे शहरात पुन्हा एकदा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बंडू आंदेकर गट आणि कोमकर टोळीतील वैर पेटलेले आहे. आयुषच्या हत्येनंतर आंदेकर टोळीतील एकावर हल्ला झाल्याने पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, ही हत्या गँगवॉरमधून झालेली नाही, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka