मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ पाहून रवीनावर ती दारूच्या नशेत असल्याचा देखील आरोप होत आहे. पोलिसांनी याबाबत खरी माहिती दिली आहे.
मुंबईच्या वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओत रवीना टंडन हिच्यासोबत काही जण वाद घालत आहेत, तसेच तिला धक्काबुक्की देखील करत आहेत. तसेच त्या पीडिताच्या मुलाने, रिझवी लॉ कॉलेजजवळ रवीना टंडनच्या कारने त्याच्या आईला धडक दिली. या घटनेनंतर अभिनेत्री आणि तिच्या ड्रायव्हरने माफी मागण्याऐवजी पीडिता आणि त्याच्या कुटुंबीयांशी जोरदार वाद घातला, अशी माहिती दिली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविना टंडन हिच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून दोन्ही पक्षांनी याविषयी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. रवीना टंडन आपल्या ड्रायव्हर सोबत आपल्या घरातून गाडीत बसून बाहेर पडत होती, तेव्हाच रस्त्यावर पायी चालत असलेल्या एक परिवार तिच्या गाडीजवळ पोहोचला. तिच्या गाडीचा परिवारातील सदस्याला धक्का लागला. त्यानंतर त्या परिवारातील सदस्यांनी रवीना टंडन हिच्या विरोधात गोंधळ करायला सुरुवात केली. याचाच व्हिडीओ बनवला गेला. रवीना आणि तिच्या ड्रायव्हरने या सदस्याला मारहाण केलेली नाही.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'दरम्यान, व्हिडीओ पाहून रविना दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात होते. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी रवीनाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रवीना नशेत असल्याची टीका तिच्यावर होत आहे.
अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…
राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…
अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर अचानक राहिल्या हजर…
अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…
The post अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

