Dailyhunt
अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या.

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या.

हमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या सावळीविहीर गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे.

कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद होते. आरोपी सुरेश निकम याने रागाच्या भरात घरात घुसून कुटुंबियांवर वार केले. त्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू जागीच ठार झाल्या. यामध्ये सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमींना नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे.

आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पत्नीचे नाव वर्षा सुरेश निकम (वय 24), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25), आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

मृत वर्षा सुरेश निकम यांची भावजई श्वेता गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश निकम रात्री अचानक आला. दरवाजा उघडल्यानंतर लगेच वार करण्यास सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटात सहा जणांवर वार केल्यानंतर सुरेश पळून गेला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रस्त्याच्या कडेला नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले अन् घात झाला…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka