अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील एका वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर दोन युवकांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन अल्पवयीन मुली जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील वस्तीगृहात शिक्षणासाठी राहत आहेत. पीडित मुलींवर दोन युवकांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीनेच या दोन आरोपींची ओळख त्यांच्याशी करून दिली होती. या प्रकरणात तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post अहमदनगर जिल्ह्यात वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

