Dailyhunt
अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी.

अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी.

हमदनगर: अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर दौंड महामार्गावर आज (रविवार) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी कल्याण वरून नगरकडे येत होते. यावेळी दौंडजवळ त्यांच्या एसयुव्हीची आणि भरधाव ट्रकची धडक झाली. अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झालेत. शाबाज अजीज शेख (वय ३०), गाजी रउफ बांगी (वय १३) व मुलगी लुजैन शोएब शेख (वय १३, सर्व रा. कल्याण) अशी मृतांची नावे आहेत. तर इतर ८ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींमधील काही जणांना दौड तर काही जणांना श्रीगोंदा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka