Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्.

अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्.

मुंबई : पतीला राहत्या घरात पुरणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घतले आहे. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा लावण्यात यश मिळाले आहे.

कोमल चौहान आणि मोनू शर्मा असे आरोपींची नावे आहेत. आरोपी महिला कोमल आणि मोनू या दोघांचे नालासोपाऱ्यातील एका चाळीतच घर आहे. विवाहीत असूनही कोमलचे मोनूसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, कोमलचा पती विजय हा त्या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरता होता, अखेर त्या दोघांनी विजयचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार, त्यांनी विजयची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यांच्या राहत्या घरातच त्याचा मृतदेह पुरून ठेवला.

महिलेचा दीर घरी आला असता आणि दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी कोमल चौहान देखील बेपत्ता झाली होती. तिच्या पाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा युवकही बेपत्ता झाला होता. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हत्येचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना पकडण्याचे खूप मोठे आव्हान पेल्हार पोलिसांच्यासमोर होते. हत्येच्या आरोपींना पकडण्यासाठी विरार गुन्हे शाखा, मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि पेल्हार पोलिसांच्या टीम आरोपींच्या मागावर होत्या. मात्र अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध…

कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…

दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…

The post अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka