Dailyhunt
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्.

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्.

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून, आता त्याच्या आर्थिक फसवणुकीचे आणखी धागेदोरे समोर आले आहेत. चिंचुके, बनावट खडे यानंतर आता "तुर्की मध" विक्रीच्या नावाखालीही भक्तांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

अशोक खरात "तुर्की मध" कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत असे. विशेषतः लैंगिक अडचणींवर उपाय म्हणून हा मध प्रभावी असल्याचे सांगून तो अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दरात विकत होता. एका किलो मधाची बाटली तब्बल 9 लाख रुपयांना विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. खरात या मधाला "एल्विश हनी" असे नाव देत असे आणि तो तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून मिळतो, असा दावा करत होता. या कथित दुर्मिळतेमुळेच मधाची किंमत प्रचंड असल्याचे सांगून तो भक्तांचा विश्वास संपादन करत असे. मात्र, हा सगळा प्रकार बनावट असल्याचा संशय तपासात व्यक्त केला जात आहे.


माध्यमातून मिळालेली कोट्यवधींची रक्कम खरात आपल्या ट्रस्टच्या नावावर जमा करत असल्याचेही समोर आले आहे. या व्यवहारांद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार (मनी लॉन्डरिंग) झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. चिंचोके, खडे, तांत्रिक विधी आणि महागडे मध, अशा विविध माध्यमांतून अशोक खरात याने लोकांच्या अंधश्रद्धेचा आणि वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत मोठे आर्थिक जाळे उभे केले असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, भोंदू अशोक खरात विरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून नव्याने 3 तक्रार दाखल झाल्या आहेत. अशोक खरात विरोधात दाखल तक्रारीत एका विद्यार्थिनीचा देखील समावेश आहे. अशोक खरातने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. धार्मिक विधी, लग्न जमवून देणे, पूजाविधी, भविष्य सांगणे अशा वेगवेगळ्या बहाण्याने अशोक खरातने महिलांवर अत्याचार केले आहेत. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज (मंगळवार) संपणार असून त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka