Dailyhunt
अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये तो काही विवाहित महिला आणि युवतींसोबत अघोरी विधी करायच्या नावाखाली अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचे हे व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे.

लैंगिक शोषण प्रकरणातील महिलांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि महिलांची ओळख उघड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगावमधील राहुल शिंदे आणि योगेश आढावसह बीडमधील संदीप गरजे या तीन व्यक्तींच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसात गुन्हा दाखल दाखल केला आहे. या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.


पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढावने तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगाव मधील संदीप गरजे याने हे व्हिडिओ पाठवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी व्हिडिओ पाठवणाऱ्यांची साखळीच उघडकीस आणली आहे.

पोलिसांनी अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना इशारा दिला आहे. कोणाकडेही पीडित महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची ओळख, तिच्या घराची, तिच्या कुटुंबीयांची ओळख उघड होईल, असे व्हिडीओ किंवा अश्लील व्हिडीओ असल्यास तत्काळ डिलिट करावेत. सोशल मीडियावर प्रसारीत करू नयेत. असे व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधितांवर आणि ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka