Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट.

अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट.

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अशोक खरात याचे एकूण १७ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते अवघ्या २० ते ५० रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

अशोक खरात आणि काही पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर सेलने अधिकृतपणे एफआयआर (FIR) दाखल केली आहे. आयटी (IT) कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या कारवाईमुळे संबंधित संशयितांचे धाबे दणाणले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

तपासादरम्यान, सायबर सेलच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात यांच्याशी संबंधित सुमारे १५ ते १७ आक्षेपार्ह व्हिडिओ फेसबूक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि काही पोर्न साइट्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर सेलने व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या चार प्रमुख सोशल मीडिया अकाऊंट विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे अश्लील व्हिडिओ अवघ्या २० ते ५० रुपयांमध्ये विकले आहेत.

दरम्यान, संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेक पीडित महिलांची ओळख सार्वजनिक झाली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, पीडितांची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा असून, यातून संबंधित महिलांना मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, “आम्ही एफआयआर दाखल केली असून तपास वेगाने सुरू आहे. सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू असून, या प्रकरणात सामील असलेल्या आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील.”

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka