Dailyhunt
अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए.

अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए.

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु असून, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली अशोक खरात याने केली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचे समोर आले आहे.

या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे.

भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याने अखेर तोंड उघडलं आहे. त्याने महिलांवर अत्याचार कसा केला याची कबुली दिली आहे. मात्र या अत्याचाराला त्याने विज्ञानाला जोडण्याचा प्रयत्न केला. महिलांना धमकावून आणि हातचलाखीने त्यांना आकर्षित करून शोषण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच शोषण केल्याची अशोक खरातने कबुल केल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचे अशोक खरात याने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक खरातची मुलगी तृप्ताबाला हिची आज एसआयटी चौकशी होणार आहे. मुलगी तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. तर लवकरच दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची देखील माहिती आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरात याने महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे केल्याप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल गुन्हासंदर्भात सुरू असलेल्या तपासाची एसआयटीकडून महत्वाची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासानंतर स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच प्रत्यक्ष साधणार माध्यमांशी संवाद आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने पीडित महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केले. ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचे त्याने मान्य केले. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही ट्रिक्स वापरून त्याने महिलांना भुलवल्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातने स्वत:च कथित दैवी शक्तीमागचं थोतांड उघड केले आहे.

अशोक खरातने हा कबुली जबाब दिल्यानंतर त्याची विकृत मानसिकता समोर आली आहे. या घृणास्पद कृत्यात त्याला आणखी कुणाची मदत होत होती का? यात आणखी कोण कोण सहभागी आहे? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. तपासादरम्यान, ‘झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए’ या खरातच्या वाक्यामुळे त्याचा कोठडीत देखील माज कायम असल्याचे दिसून येत आहे. आज एसआयटीमार्फत पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासे होण्याची शक्यता आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka